‘राडा’ संस्कृतीमुळे रावतची पराभवाकडे वाटचाल?
मूल (प्रतिनिधी)
बल्हारपूर विधानसभा क्षेत्रात काल रात्रौ कोसंबी येथे झालेल्या कॉंग्रेस—भाजपा राड्यानंतर, कॉंग्रेस उमेदवार संतोष रावत यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात त्यांना आचारसंहिता भंगाची तक्रार करावयाची होती तर, निवणूक आयोग, पोलिस स्टेशन सारखे पर्याय असतांनाही, त्यांनी कायदा हातात घेवून, आपली ‘प्रवृत्ती’ दाखविण्याची खेळी त्यांचेवरच उलटतांना दिसत आहे. निवडूण येण्याचे आधीच ही परिस्थिती आहे तर चुकून आमदार बनले तर, मूल सारख्या शांत भागात गुंडगीरी वाढण्याची भिती मतदारात वाढत असल्यांने, रावतच्या विजयाच्या रथाला ब्रेक लागले आहे. या घटनेत सहभागी संतोष रावत यांचे समर्थक कार्यकर्ते विजय चिमड्यालवार, राकेश रत्नावार यांचेसंदर्भात यापूर्वीही निवडणूकीत मारहाण करण्यांच्या अनेक घटनांना कालच्या घटनेमुळे उजाळा मिळाला आहे. मतदारात आज काल संतोष रावत समर्थकांनी मुनगंटीवार यांचेवर केलेल्या हल्याचीच सर्वत्र चर्चा सुरू असून, आज सरंक्षणात असलेल्या मंत्री पदावर असणार्या व्यक्तीवर ते या पध्दतीने हल्ले करीत असेल तर, उद्या निवडूण आले तर सामान्य जनतेला काय हाल करतील असा गंभीर प्रश्न मूल तालुक्याच चर्चेला जात आहे.
संतोष रावत यांचेकडे असलेला दलित—मुस्लीम समाज डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे केटलीकडे सरकत असल्यांने, पराभवाची चाहूल रावत यांना लागली आणि नैराश्येतून त्यांनी प्रसिध्दीकरीता आणि दहशत निर्माण करून मतदान घेण्याकरीता कालची घटना ठरवून घडविण्यात आली अशीही चर्चा आहे. यापूर्वीच्या निवडणूकाही संतोष रावत व त्यांचे समर्थकांनी, धमकी देवून, दहशत निर्माण करून जिंकल्या होत्या. मात्र ही निवडणूक मोठी असल्यांने, रावतचा ‘दबावतंत्राचा’ गणित येथे फसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मूल शहरात गुन्हेगारी नव्हती, मात्र पहिल्यांदाच संतोष रावत यांचेवर गोळीबार करण्यात आले होते. आरोपींनी, संतोष रावत यांनी नौकरी लावून देतो म्हणून लाखो रूपये घेतले पण नौकरी लावून दिली नाही किंवा पैसेही परत न केल्याने गोळीबार केल्यांचे पोलिसांना दिलेल्या बयानात सांगीतले होते. रावत यांचा हा ‘इतिहास’ही आता मतदारांत चर्चेचा विषय झाला आहे. रावत यांना निवडूण आणणे म्हणजे मूलचा बिहार करणे होय असे मतदार बोलत आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, रात्रौ उशीरा संतोष रावत व त्यांचे समर्थकांनी फिस्कुटी येथे बैठक घेण्याकरीता गेले मात्र गावकर्यांनी त्यांना गावातून पिटाळून लावल्यांने संतप्त झालेल्या रावत समर्थकांनी फिस्कुटीचा राग कोंसबीत काढल्यांची आज मूल शहरात वार्यासारखी परसली.
फिस्कुटीत हाकलल्याने कोसंबीत राग काढल्यांची चर्चा