चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या भरतीत गैरव्यवहाराचा आरोप

35

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधि

: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील लिपीक आणि शिपाई पदांच्या नोकरभरतीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी मुख्यमंत्र्यांना उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्तीं सहकारी बॅंकेतील लिपीक २६१ आणि शिपाई ९७ पदांसाठी आॅनलाईन परिक्षा २१ ,२२,२३ आणि २९ डिसेंबरला पार पडली. नोकर भरतीत संचालक मंडळांनी संविधानाच्या मुलभूत तत्वाला पायदळी तुडविले. नोकर भरतीत आरक्षण ठेवले नाही. तीस टक्के महिला आरक्षणाचा विसर संचालक मंडळाला पडला. शिपाई पदांच्या मुलाखती १३, १४ आणि १५ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर लिपीक पदांच्या १६ ते २३ जानेवारी दरम्यान मुलाखती होणार आहे. ही संपूर्ण नोकर भरतीच संशयास्पद आहे. या नोकर भरतीची उच्चस्तरीय चौकशी केल्यास मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर येईल. त्यामुळे त्वरीत मुलाखती थांबविण्यात याव्यात, ही नम्र विनंती. परिणामी सक्षम आणि पात्र विद्यार्थ्यांच्या संधी हिरावल्या जाणार नाही. जवळपास शंभर कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या नोकर भरतीतील गैरव्यहाराची पटकथा कशी लिहील्या गेली. त्याची ही सविस्तर माहिती.

* – मागील १२ वर्षांपासून या बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली नाही. याकाळात नोकर भरती आणि अन्य गैरव्यवहारात दोन माजी अध्यक्षांवर गुन्हा दाखले झाले. त्यांना तुरुंगात जावे लागले. या बॅंकेतील एक माजी संचालक राज्यातील नोकर भरतीच्या रॅकेटसोबत सक्रीय आहे. अनेक शासकीय भरतीत त्याने गैरव्यवहार केले आहे. त्याच संचालकावर आॅनलाईन नोकर भरतीतील सेटींगची जबाबदारी देण्यात आली. या बॅंकेतील नोकर भरतीचा यापूर्वीचा वादग्रस्त इतिहास बघता आपण कोणत्याही कायदेशीर प्रक्रीयेत अकडून नये, यासाठी त्याने संचालक पदाचा राजीनामा देत ही जबाबदारी स्वीकारली. नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आयटीआय कंपनीतील एक वरिष्ठ अधिकारी श्री. पद्ममेश याला हाताशी पकडले. आॅनलाईन परिक्षेत उत्तीर्ण करुण देण्यासाठी प्रति उमेदवारामागे तीन लाख रुपये याप्रमाणे दहा कोटींची डिल आटीआय कंपनीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांशी झाली.

* -आयटीआय कंपनीतील अन्य कर्मचारी आणि आॅनलाईन भरती प्रक्रीयेत नेहमी घोळ करणारेही याच काळात सक्रीय झाले. त्यामुळे आॅनलाईन परिक्षेच्या पहिल्याच दिवशी २१ जानेवारीला राज्यातील काही मोजक्या केंद्रावर तांत्रिक बिघाड झाला आणि परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मात्र हा तांत्रिक बिघाड नव्हता. काही हॅकर्सनी स्क्रीन हॅक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या चोरीत आणखी वाटकेरी निर्माण झाल्याचे कंपनी आणि या गैरव्यवहारत सक्रीय बॅंकेतील काही संचालकांच्या लक्षात येताच त्वरीत परिक्षा पुढे ढकलण्यात आली. मुळात आयटीआय कंपनीने परिक्षेच्या दोन दिवस आधी मॅाक ड्रील घेतली होते. ते यशस्वीही ठरले. विशेष म्हणजे आॅनलाईन परिक्षेत एकूण परिक्षणार्थ्यांच्या दहा टक्के संगणक राखीव असतात. त्यानंतरही हा प्रकार तांत्रिक बिघाड म्हणून सांगण्यात आला. मात्र हा सायबर हल्ला होता. या सायबर हल्ल्यात बॅकेतील एक विरोधी संचालकही सामील आहे.

*- सुरूवातीला काही संचालकांनी रोख रक्कम स्वीकारली. मात्र भरतीला होणार विरोध आणि पैसे घेतल्याच्या तक्रारी पोलिसांकडे झाल्यानंतर ते सावध झाले. त्यानंतर त्यांनी सेटींगवाल्या उमेदवारांचे ओरीजन डाक्युमेंन्टस आपल्याकडे तारण म्हणून ठेवले. मुलाखतीला जाताना आणि डॅाक्युमेंट व्हेरीफेकशन साठी ओरीजनल कागदपत्र हवे असतात. ते सोडविण्यासाठी तीस ते ४० लाख रुपये उमेदवार देत आहे. बॅंकेतील काही संचालक आणि आयटीआय कंपनीचे अधिकारी यांचा भ्रमणध्वनाची सीडीआर काढल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील.संचालक, उमेदवारांच्या रक्तांच्या नातेवाईंकांच्या खात्यांची तपासणी केल्यास पैशांची देवाणघेवाण नेमकी किती झाली, हे पुढे येईल.

*- नोकर भरतीत घोळ करताना अतिशय सावध पाऊल टाकण्यात आली. कंपनीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांशी तीन लाख रुपयात प्रति उमेदवाराला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करुन देण्यासाठी करार झाला. मात्र यावेळी कंपनीने पद्धत बदलली. नीटच्या परिक्षेतील आॅनलाईन घोळ समोर आल्यानंतर केंद्र शासनाने एक कायदा तयार केला. दहा वर्षांची रिक्षा आणि एक कोटींचा दंड असा नव्या कायद्याचे स्वरुप आहे. त्यामुळे पेपर फुटीसारखे प्रकार टाळले. यावेळी सेटींग झालेल्या परिक्षार्थ्यांना तुम्ही फक्त परिक्षेला जा. ज्या प्रश्नांचे उत्तर शंभर टक्के माहित आहे. तिथेच क्लिक करा, असे सांगण्यात आले. उमेदवारांनीही तसेच केले. मात्र सहा जानेवारीला पहाटे ५ वाजता उत्तरपत्रिका आली आणि सेटींगसाठी पैसे आणि कागदपत्र दिलेल्या उमेदवारांचे आणि काही संचालकांचे धाबे दणाणले. सेटींग वाल्या उमेदवारांना केवळ एक ते दोन मार्क मिळाले होते. यातही हुशारी करण्यात आली. उमेदवारांचे गुण फक्त त्यालाच दिसावे यासाठी त्यांच्या लॅागिन आयडीवर उत्तरपत्रिका पाठविण्यात आली. ती कुणाला दाखवू नका, असेही त्यांना सांगण्यात आला. मार्क बघू अस्वस्थता वाढल्यानंतर पुन्हा कंपनीशी सोटलोट सुरु झाले. त्यासाठी माजी संचालकांनेच पुढाकार घेतला. कंपनीने बऱ्याच बैठकाअंती तोडगा काढला आणि त्यांनीही काम होवून जाईल असा विश्वास दिला.

* -या आॅनलाईन परिक्षेत अनेक प्रश्न चुकीची आली होती. विद्यार्थ्यांच्या आयडीवर उत्तरपत्रिका आल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर बदलेली होती. गुण बदलले. दरम्यान याच चुकीच्या प्रश्नांचा आधार घेवून सेटींगचे काम पार पाडले. आॅबजेक्शन टाकून आॅनलाईन उत्तर पत्रिका ५ जानेवारी ते ९ जानेवारी या काळात बदलविण्यात आल्या. ज्यांनी शेवटच्या टप्प्यात पूर्ण पैसे दिले. त्यांच्या दोन तीन मार्कांचे ७०-७५ मार्क झाले. ज्यांनी पैसे दिले नाही. त्यांना उद्यापही एक दोनच मार्क आहे. आॅनलाईन परिक्षेत पर्यायी उत्तर होते. निगेटीव्ह मार्कींग नव्हती. त्यामुळे कोणताही परिक्षार्थी एक तास परिक्षा केंद्रात बसल्यानंतर त्या उत्तर येवो अथवा नाही. त्यावर क्लिक करतातच.ते. परंतु चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या परिक्षा याला अपवाद ठरली. ज्यांना अत्यंत कमी गुण मिळाले आहे, अशा परिक्षार्थ्यांची विचारपूस केल्यास अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येतील. नार्मलाजेशनचा नियम वापरूनही सेटींग बाहेरील (ज्यांनी पैसे दिले नाही ते परिक्षार्थी) परिक्षार्थ्यांचे गुण मुलाखती नंतर बदलविण्यात येणार आहे. ज्यांनी पैसे दिले. त्यांनाच मुलाखतीत चांगले मार्क मिळेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे मुलाखतीच्या पॅनलमधील सहभागी सदस्यांचीही चौकशी झाली पाहिजे.

* – १३ जानेवारीपासून मुलाखतींना सुरुवात होणार आहे. सर्वसाधारणतः सर्व परिक्षार्थ्यांचे गुण आॅनलाईन जारी करूनच मुलाखतीचे पत्र पात्र उमेदवारांना पाठविता येते. मात्र आयटीआय कंपनीने पुन्हा विद्यार्थ्यांच्या लॅागिन आयडीवर आधी मुलाखतीचे पत्र पाठविले. त्यानंतर मुलाखतीला बोलविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. परंतु या उमदेवारांना गुण किती मिळाले, हे जाहीर केले नाही. हा संपूर्ण संशायस्पद प्रकार आहे. पहिल्या दिवशी आॅनलाईन परिक्षेत घोळ समोर आल्यानंतर राज्यभरातील परिक्षार्थ्यांनी गैरव्यवहाराच्या संशयावरून परिक्षकेडे पाठ फिरविल्याचे लक्षात येते. शिपाई पदासाठी १२ हजार २८० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तब्बत आठ हजार ८९५ उमेदवारांनी परिक्षाच दिली नाही. केवळ तीन हजार ७८४ उमेदवारांनी परिक्षा दिली. लिपीक पदासाठी १८ हजार ८७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सात हजार ४५० परिक्षार्थ्यांनी परिक्षा दिली. अकरा हजार ४२६ उमेदवार गैरहजर होते. ही परिक्षा निष्पक्ष होईल, याची याची शाश्वती उमेदवारांना नव्हती. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येत उमेदवार गैरहजर होते.

* -शिपाई पदांच्या मुलाखतीला बोलविण्यासाठी २९१ पात्र उमेदवारांची यादी बॅंकेने जाहीर केले. या यादीतील उमेदवारांचे पत्ते शोधल्यास बॅंकेच्या नोकर भरतीतील घोळ समोर येईल. जवळपास ९० टक्के नाव ही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. पात्र या दोनच जिल्ह्यातील विद्यार्थी ठरले. त्यातही मुल, ब्रह्मपुरी, सावली, वरोरा, राजुरा, भद्रावती याभागातील उमेदवार मोठ्या संख्येत मुलाखतीसाठी बोलविले आहे. एका जागेसाठी तीन याप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले आहे. या इतर जिल्ह्यातील काही उमेदवारांची समावेश असला तरीही अंतिम निवड ही चंद्रपूर जिल्हयातील उमेदवारांचीच होईल. त्याचीही चौकशी झाली पाहिजे.

उपरोक्त मुद्दे बॅंकेतील आणि कंपनीतील एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यास कोट्यवधी रुपयांची बेरोजगार युवकांकडून होणारी लुट थांबेले. सक्षम आणि खऱ्या पात्र उमेदवाराला नोकरी मिळले. नोकरीला पैस देण्यासाठी अनेक उमेदवारांच्या आईवडिलांनी शेत जमीन विकली आहे. दागिने गहाण ठेवले आहे. हा प्रकार महाराष्ट्राला लाजविणारा आहे. या नोकर भरतीची निष्पक्ष चौकशी होवून दोषींना शिक्षा झाली नाही तर परिक्षेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास उडले. त्यामुळे याची चौकशी करावी आणि दोषींना गजाआड करावे. अशी मागणी करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here