हल्ल्यामुळे विकास रथ थांबणार नाही
मूल, प्रतिनिधी
कोसंबी येथे झालेल्या भाजप काँग्रेस राड्यामध्ये सहभागी असलेले दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांना उपविभागीय दंडाधिकारी मुल यांनी एक दिवसा करिता स्थानबद्ध केले आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
काँग्रेसचे कार्यकर्ते राकेश रत्नावार विजय चिमड्यालवार, बाबा अझीम आणि कोसंबीचे सरपंच रवींद्र कामडी यांचा समावेश आहे.
भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत अष्टणकर, निलेश रायकंटीवार, किशोर कापगते, नरसिंग गनवेनवार राहणार मरोडा यांचा समावेश आहे.
निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्थ राखण्याकरिता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना भारतीय न्यायसंहितेच्या कलम 163 (3) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी मुल यांनी या सर्वांकरिता स्थानबद्धतेचा आदेश पारित केले आहे.
दिनांक 18 नोव्हेंबर रोजी कोसंबी येथे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला केल्याचा रावत समर्थकावर आरोप आहे तर, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
उल्लेखनीय म्हणजे यातील अनेक कार्यकर्ते मूलच्या गांधी चौकात खुलेआम फिरताना, मतदारांना ने-आण करताना दिसत होते.