मोदी म्हणाले, डबल इंजिन म्हणजे डबल विकास
- चंद्रपूर, (हरी वार्ता नेटवर्क)
- “भाजपा महायुती आहे तर राज्याची प्रगती आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला देखील माहिती आहे. या निवडणुकीनंतरही राज्यात भाजपा महायुतीचं सरकार स्थापन होईल असा विश्वास आज पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूर येथे व्यक्त केला.
- भाजपा उमेदवारांच्या संयुक्त प्रचार सभेत ते बोलत होते. मोदी म्हणाले, महाराष्ट्र भापाला मी शुभेच्छा देतो. की त्यांनीं एवढ्या चांगल्या पद्धतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी, युवकांसाठी आणि विकासासाठी एकापेक्षा एक असे अनेक चांगले संकल्प करण्यात आले आहेत.
- महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार म्हणजे दुप्पट वेगाने विकास. आज महाराष्ट्र असं राज्य आहे की त्या राज्यात सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्रात अनेक विमानतळं निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात जवळपास १२ वंदे भारत ट्रेन सुरु आहेत”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
- महाराष्ट्रात प्रचारासाठी मुम्बई सह दिल्लीतील दिग्गज नेते देखील विविध मतदारसंघात सभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी चंद्रपूरच्या चिमुरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा केला.