जोरगेवारांच्या हाती कमळ?
सेनेच्या गिऱ्हेकडे एबी फॉर्म?
चंद्रपूर, दि.26
चंद्रपूर जिल्हयात विधानसभा निवडणुक होऊ घातली आहे. मात्र त्या पुर्वी अनेक घटना नाटकी ढंगाने घडताना दिसत आहेत.
ज्या जोरगेवारांना भाजपात घ्यायचे नाही म्हणून मुनगंटीवार यांनी नड्डाचे उंबरठे झिजवले त्यांच्याच उपस्थितीत जंगी भाजप प्रवेश होण्याचे संकेत मिळाले आहेत. याचाच दुसरा अर्थ मुनगंटीवार यांचा जोर किंवा प्रभाव ओसरला असाही लावत आहेत. आता पाझारे बंडखोरी करतात का? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
उबाठा चे संदीप गिऱ्हे बल्लारपूर मधुन उमेदवारी दाखल करणार असे दिसत आहे. युती धर्म बाजूला ठेऊन ते अशी भूमिका नेमकी कुणाच्या सांगण्यावरून घेत आहेत? हा खरा प्रश्र्न आहे. त्यांनीं या क्षेत्रात खुप जन संपर्क केला, हे सर्वश्रुत आहेच. तिकडे डॉ. विश्वास झाडे यांनी प्रयत्न सोडलेले नाहित.
चंद्रपूर मध्ये अंभोरे की खोब्रागडे? असा एक सुर आहे. डॉ. कांबळे आणि राजु झोडे आऊट झाल्याची आणि घोटेकर यांचें ऐन वेळी नाव आल्याची सुद्धा चर्चा आहे. रावतांनी फॉर्म भरला असला तरी एबी फॉर्म त्यांना अजून मिळालेला नाही. वरोरा भद्रावती क्षेत्रात अनिल धानोरकर बंड करतील काय? असाही प्रश्र्न आहे. या नाटकी वळणात दोन्ही मोठ्या पक्षांना फटका बसला तर तो जवळपास सारखाच असेल असे राजकिय धुरिणांना वाटत आहे.