डॉ. विश्वास झाडे यांना बल्लारपूरातून उमेदवारी देण्याचा आग्रह
चंद्रपूर, दि.26
समाजाच्या लोकसंख्या निहाय शक्ति कडे बघता प्रत्येक समाजाकडून उमेदवारी करीता आग्रह धरला जात आहे. माळी समाजाने तर ब्रम्हपुरी मध्ये रण माजवण्याची ताकीद देऊन टाकली आहे. अश्यात आता तेली समाजाच्या भावना सुद्धा तीव्र झाल्याचे दिसत असुन निवडणुकीवर त्याचा खोल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने डॉ. विश्वास झाडे यांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी देण्याचा आग्रह समाजाने धरला आहे.
डॉ. विश्वास झाडे हे उच्च शिक्षीत असुन सेवाभावी आहेत. त्यांचें नर्सिंग कॉलेज असुन हृदयरोग तज्ञ म्हणूनही त्याचा नावलौकिक आहे. तेली समाज संघटना सुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत.
बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत मागील वेळी त्यांचा विजय थोडक्यात हुकला होता. त्यानंतर सुद्धा ते सामाजिक कार्यात खुप सक्रिय राहिले. विशेषतः कोरोना काळातील त्यांचें कार्य सर्वांना आवडले आहे.
चंद्रपूर जिल्हयात बल्लारपूर हाच एकमेव भाग तेली बहुल आहे. जिल्हयात तसेही देवराव भांडेकर यांच्या नंतर तेली समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले नाही. तेली समजावर सर्वच पक्षांनी अन्याय केला आहे, अशी आता लोकांची भावना होऊ लागली आहे. स्व. इंदिराजी यांच्या काळात विदर्भात तेली समाजाचे 8-9 आमदार होते. तेली समाजानेही पक्षांना बळ देण्याचे काम केलें आहे. मात्र आता हाच समाज उपेक्षित होऊन गेला आहे. आता अलीकडेच माळी समाजाने ब्रम्हपुरी मध्ये बंडाचे संकेत दिल्या नंतर तेली समाजाचा अपेक्षा आणि भावना सुद्धा जागृत झाल्या आहेत. त्यामूळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात डॉ. विश्वास झाडे यांना उमेदवारी मिळावी अशी भावना समाजाकडून व्यक्त होत आहे.