तर विजय वडेट्टीवार मूल सारखा विकास करतील!
मूल दि.
ब्रम्हपुरी मतदार संघातून कॉंग्रेसकडून उभे असलेले उमेदवार विजय वडेट्टीवार यांना लोक आता विकासावरून प्रश्न विचारू लागले आहे. भाजपाने यावेळी कुणबी कार्ड खेळल्यांने अडचणीत आलेले वडेट्टीवारांनी प्रचाराचा जोर वाढविला आहे. सावली तालुका मूल तालुक्याला लागूनच आहे. मूल तालुक्यातील विकास, रस्त्यांची कामे यामुळे सावली तालुक्यातील नागरीकांना हेवा वाटत असून, लोंढोली, हरांबाच्या विजय वडेट्टीवार यांचे प्रचारात, मूल तालुक्यात ऐवढा विकास होतो मग आमच्या भागात तसा विकास का नाही? असा थेट प्रश्न वडेट्टीवार यांचा प्रचार करणार्या कार्यकर्त्यास विचारला. यावर, उत्तर देताना, सुधीर मुनगंटीवार हे मंत्री आहेत, सत्ता आहे, त्यामुळे ते मूलचा विकास करू शकले. आता आपले भाऊही मोठे मंत्री होणार आहे. मंत्री झाल्यावर तुमचाही मूल सारखाच विकास करू असे सांगत, मूल भागातील विकासावर वडेट्टीवार यांचे कार्यकर्ते शिक्कामोर्तब करीत आहे.
बल्हारपूर मतदार संघात सुधीर मुनगंटीवार यांनी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर अनेक विकास कामे केली. यामुळे मूल, पोंभूर्णा व बल्हारपूर तालुक्याचा चेहरा—मोहरा बदलला. या विकासाची चर्चा सर्वदूर होते. असाच विकास आमचे लोकप्रतिनिधी का करीत नाहीत असा प्रश्न आता मतदार विचारू लागले आहे. मूल सोबत आपल्या भागाची तुलना करीत, विकास न करणार्या आपल्या नेत्यांवर तोंडसुख घेत आहेत.