काँग्रेस मधुन निष्कासित होताच सूरु झाल्या आरोपाच्या फैरी
मूल दि. 12
एससी, एसटी, ओबीसी आणि विमुक्त भटक्या जमातीचं आरक्षण हडपण्याचं काम संतोष रावत यांनी केलं आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकरभरती जाहिरातीतून हे सिद्ध झाले आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळं संतोष रावत यांचा आरक्षण विरोधी चेहरा उघड झाला आहे. संतोष रावत यांनी बँकेत बोगस कामं केल्याचा आरोप आता राकेश गावतुरे यांच्याकडून होत आहे.*
आचारसंहितेच्या काळात बँकेत नोकर भरती सुरू होती. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही जाहिरात रद्द करण्यात आली नाही. प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. राज्य सरकारने पदे भरण्यासासाठी दिलेल्या मंजुरी पत्रातील काही अटी व शर्ती आहेत. त्याचं उल्लंघन संतोष रावत यांनी केलं. नोकर भरती करणाऱ्या एजन्सीचं नावही उघड करण्यात आलं. इतर मागासवर्गीय, एससी, एसटी, भटक्या विमुक्त जातींसाठी आरक्षण सरळसेवा भरतीत ठेवण्यात आलं नाही. यासाठी कोणतंही कारण रावत यांनी दिलं नाही.
अश्याही गैरप्रकाराच्या फैरी
बँकेत कमी कर्मचारी असल्याची बाब पुढे करण्यात आली. बँकेच्या 40 बँक शाखेत अडीचशे ते पाचशे रुपये दर ठरवून 150 लोकांना रोजंदारीवर ठेवण्यात आलं आहे. मागील पाच वर्षांपासून हे कर्मचारी काम करीत आहेत. अध्यक्ष संतोष रावत, बँकेचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासन विभाग प्रमुख हे अनागोंदी करीत असल्याचा आरोप गावतुरे यांचा आहे. नोकरी लावून देण्यासाठी लोकांना पैशांची मागणी केली जात आहे. त्याची चौकशी करण्याची मागणीही गावतुरे यांनी केली आहे. बँकेच्या एसआर पॉलिसीत बदल करण्यात आला. मात्र हे करताना बँकेच्या संतोष रावत यांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतलेच नाही, असा थेट आरोप गावतुरे यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सध्या कालबाह्य संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मुदत संपल्यानंतरच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी देखील राकेश गावतुरे यांनी केली आहे. एकूणच आपल्या तक्रारीतून गावतुरे यांनी संतोष रावत यांनी बोगस कामे केली असा थेट आरोप केला आहे. हे सर्व आरोप त्यांनी लेखी स्वरूपात करीत तक्रार दाखल केल्यानं रावत अडचणीत आले आहेत.