भाजपातही पक्ष निष्ठेचा मुद्दा ऐरणीवर
चंद्रपूर, दि.25
पक्ष निष्ठा आता लिहायला किंवा बोलायला केवळ शब्द म्हणून राहिला असून सर्वच पक्षात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. आज चंद्रपूर येथून शेकडो कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांचा ताफा नागपूरला दाखल झाला. पाझारे यांच्या समर्थनात हे शक्ती प्रदर्शन करून श्रेष्ठींचे लक्ष वेधण्याचा जोरकस प्रयत्न करण्यात आला.
चंद्रपुर विधानसभेत अनेक पक्ष फिरून आलेला नेता भाजपचा अधिकृत उमेदवार नसावा, अशी तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. चंद्रपुरात नागपूर मार्गावरील क्लब ग्राउंड जवळ विजय राऊत, राहुल पावडे, मंगेश गुलवाडे,नामदेव डावले, किरण बूटले, कृष्णा चंदावार, सुहास अलमस्त,
चिराग नथवानी, छबू वैरागड़े, सविता कामड़े,
वंदना तीखे असे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह
शेकडो कार्यकर्ते आज एकत्र आले होते. हीच स्थिती अहेरी आणि अमरावती करिता दिसून आल्याचे म्हटले जात आहे. तिकडे मुनगंटीवार स्वतः दिल्ली दरबारी पोहोचले. उल्लेखनीय आहे की इतका तीव्र विरोध भाजप मध्ये यापूर्वी झालेला नाही.
विजय राऊत, राहुल पावडे, मंगेश गुलवाडे,नामदेव डावले, किरण बूटले, कृष्णा चंदावार, सुहास अलमस्त,
चिराग नथवानी, छबू वैरागड़े, सविता कामड़े,
वंदना तीखे,