बहिष्काराच्या घोषणेशी गोवारी समाज असहमत

26

पत्रपरीषदेत आदिवासी गोवारी युवा शक्ति संघ ची माहीती
चंद्रपूर. दि.२२
प्रलम्बित मागण्या पूर्ण करण्याकरता आदिवासी गोंड गोवारी संघटनेने गोवारी समाज बांधव मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता परंतु या निर्णयाचा आदिवासी गोवारी जमातीशी संबंध नसल्याने आदिवासी गोवारी जमाती विधानसभा मतदान करणार अशी माहिती आदिवासी गोवारी युवा शक्ति संघ चे अध्यक्ष जीवन दुधकोहर ने श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परीषदेत दिली.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील संविधानिक गोंड n जमातीच्या(अनुसूचित जमात) संविधानिक मागण्या येत्या विधानसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता लागण्यापूर्वी मान्य न केल्यास महाराष्ट्रातील संपूर्ण गोंड गोवारी जमातीने येणा_या 2024 च्या विधानसभा निवडणूकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाचा गोवारी जमातीशी कसलाही संबंध नसल्याची माहिती दिली. मतदानापासून कोणीही वंचित राहु नये यासाठी देशभर जागृती सुरू असतांना आदिवासी गोंड गोवारी संघटनेला आमच्या मुलभूत अधिकारीशी खेळण्याचा अधिकार नसल्याचा सांगीतले. मतदानावर बहिष्कारबाबत कोणीही गोवारी नागरीकांना धमकी देऊ नये असे सांगण्यात आले. गोवारी बांधवांनी कोणालाही न घाबरता मतदान करावे असे आवाहन आदिवासी गोवारी युवा शक्ति संघ चे अध्यक्ष जीवन दुधकोहर ने केले आहे.
पत्र परीषदेला जिल्हाध्यक्ष जिवन दुधकोहर, विठ्ठल शेंदरे, वासुदेव ठाकरे, बालाराम चचाने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here