चंद्रपूरचे तहसीलदार पवार यांनी केली कारवाई को
णत्या नेत्याच्या आशीर्वादाने चंद्रपूर शी जुळले तार?
चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्हयात रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या नंतर आता गडचिरोली जिल्ह्यातील रेती तस्कर इथे तस्करी करायला लागले आहेत. गडचिरोली जिल्हा महसूल विभाग आळशी असल्याने तिकडे काहीच कारवाई केली जात नाही. याचा गैरफायदा घेत हा गोरखधंदा सुरु झाला आहे. याचे बिंग चंद्रपूर चे तहसिलदार पवार यांनी धडक कारवाई करून फोडले आहे. त्यामूळे एक वेगळेच प्रकरण चर्चेला आले आहे.
आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल गावातील नेताजी राऊत या शेतकऱ्याची शेती नदीपात्राला लागून आहे. यावर्षी नदीला पूर आल्यामुळे राऊत यांच्या शेतामध्ये अतोनात वाळू जमा झाली. त्यामुळे राऊत यांना 2.88 हेक्टर पैकी 0.83 हेक्टर वाळू उपसा करण्याकरिता 10 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत 8065 ब्रास चा रीतसर परवाना देण्यात आला. परंतु शेती उपसाच्या नावाखाली नदीपात्रातूनही पोकलेन मशीन द्वारे रेती चा उपसा खुलेआम सुरू झाला.
चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील घाट अजूनही लिलावात गेलेले नाहीत. त्यामुळे सदर रेतीला चांगली मागणी आली. याचाच गैरफायदा घेत राऊत या शेती मालका ने पैसे कमवण्याच्या नादात आपल्या शेतीसह नदीपात्रातून सुद्धा वाळू उपसा करण्याचा सपाटा चालवला. त्या नदीपात्रातून भरलेल्या रेतीला यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर मधुन प्रचंड मागणी आली. यामुळें राऊत चे मनोबल आणि लालची वृत्ती वाढली.
चंद्रपूर येथील तहसीलदार पवार यांनी दोन-तीन दिवसांत अशा 3 वाहनांवर कारवाई केली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून वाळू तस्करी होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दररोज रात्री दहा पासुन पहाटेच्या चारच्या सुमारास 60 ते 70 गाड्या वाळूची तस्करी करत आहेत. अश्या आशयाची माहिती चंद्रपूर महसूल प्रशासनाला मिळाली. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील महसूल विभागाने याकडे लक्ष कसे दिलें नाहीं? त्यांना माहितीच मिळाली नाही की, समझोता केला गेला? राऊत या शेतकऱ्याला इतकी बुध्दी कुठून सुचली? त्याचा महसूल विभागाशी सबंध काय? तस्करीची योजना कुणी आखली? त्याला राजकिय वरदहस्त असेल तर तो कुणाचा? या सर्व गंभिर प्रकाराचा करविता धनी कोण? असे अनेक प्रश्न यातुन पुढे येत आहेत.
गडचिरोली येथील खनिज अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारले असता सदर घाटाची योग्य ती चौकशी करण्याचे आदेश आरमोरी तहसीलदारांना दिलें जातील व तेथे काही अवैध काम आढळल्यास घाटाला टाळे ठोकू असे सांगण्यात आले. आरमोरी तहसीलदार यांचेशी संपर्क केला असता त्यांनीं फोन उचलला नाही. चंद्रपूरचे तहसिलदार पवार यांची विचारणा केली असता सदर वाळू ही गडचिरोली जिल्ह्यातून आल्याचे सांगण्यात आले.