वुमेन्स पाॅवर दांडिया’ ला थाटात सुरूवात 

56

खासदार धानोरकर व आमदार अडबाले यांची उपस्थिती

चंद्रपूर:
नागपूर रोडवरील नानाजी नगर महिला मंडळा तर्फे आयोजीत ‘वुमेन्स पावर दांडिया’चे थाटात उद्घाटन संपन्न झाले. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते या दांडिया कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे सुधाकर अडबाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर म्हणून मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख व माजी नगरसेविका अनुराधा हजारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
वुमेन्स दांडिया मध्ये आधी आमदार तर आता खासदार म्हणुन सत्काराचा स्वीकार करताना आनंद होत असून या परिसराचे ऋण सदैव आठवणीत राहतीलअसे धानोरकर यावेळी म्हणाल्या.
आपल्या देशासाठी व समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या इतिहासातील थोर स्त्रियांच्या कार्याचा व विचारांचा जागर करून समाजातील यशस्वी महिलांचा सत्कार करणारा हा एकमेव दांडिया कार्यक्रम असल्याचे मनोगत यावेळी आमदार अडबाले यांनी व्यक्त केले.
गेली अनेक वर्षे कठीण परिस्थितीत व संघर्षाच्या काळात आपल्या पतीची समर्थपणे साथ देणाऱ्या आमदार सुधाकर अडबाले यांच्या पत्नी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सीमा अडबाले यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमा देशमुख, सूत्रसंचालन प्रतीक्षा येरगुडे तर आभार प्रदर्शन वैशाली हिवरकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नानाजी नगर महिला मंडळाच्या शुभांगी गावंडे,अल्का लांडे,संगीता पाहुणे,मनीषा बोबडे,जयश्री लांडे,सपना राणा,योगिता नक्षिने,जयश्री पोडे,रंजीता घुमे,माधुरी शास्त्रकार,मनीषा गावंडे,प्रविणा बरडे,चेतना वाढई,शुभांगी घुमे,शीतल वलादे,मंजुषा येरगुडे,स्वाती घुमे,कुंदा देशमुख,शीतल खोंडे,जयश्री खोकले,कविता भांदककर,कल्पना तुम्मुलवार,मीनाक्षी भोंग, शशिकला पाचभाई,अश्विनी तुम्मुलवार,कुमिता कुमरे,ऊज्वला वाडगुरे,अंजली गिल्लोरकर,प्रतिभा मुके,ऐश्वर्या मडावी,प्रियांका पिंपळकर,मीरा निब्रड,साधना शेंडे,कविता अवथनकर,अरुणा महातळे,पल्लवी खाडे,रीना,मीना पारखी,गायत्री बोरीकर,अंजना राणा,पदमा चौहान,ज्योती येरगुडे,स्वाती निखाडे, नेहा पाचभाई,माया चिलकोटी यांनी अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here