बल्लारपूर महायुतीचा गुलाल उधळण्याची दिली हमी
चंद्रपूर-
बल्लारपुर विधानसभा क्षेत्राकरीता भाजपा, शिवसेना, रिपाई (आठवले), पीरिपा (कवाड़े) व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना शिवसेना पक्षाचे बल्लारपुर विधानसभा क्षेत्र पदाधिकाऱ्यांनी भेट घेत आज विवीध विषयावर चर्चा केली. सेना पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत बल्लारपुर विधानसभेत विजयी ग़ुलाल महायुतीचाच उधळला जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी (बल्लारपुर, वरोरा- भद्रावती, चिमूर विधानसभा क्षेत्र) चंद्रपुर महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम, शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, वाहतुक व वैद्यकिय जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, बल्लारपुर विधानसभा संघटीका कृष्णा सादमवार, मुल तालुका प्रमुख भारती राखड़े, मुल शहर प्रमुख अर्चना सहारे, बल्लारपुर तालुका प्रमुख शालू कन्नाके, बल्लारपुर उपतालुका प्रमुख संगीता सिडाम, बल्लारपुर शहर प्रमुख किरण हिरवाणी, पोंभूर्णा तालुका प्रमुख वंदना टेकाम, पोंभूर्णा उपतालुका प्रमुख अनुपमा तोडासे, वरोरा तालुका प्रमुख अल्का पचारे, भद्रावती तालुका प्रमुख योगिता घोरुड़े, भद्रावती नगरसेवक नानाभाऊ दुर्गे उपस्थित होते.