पैगंबर साहेब संपूर्ण जगासाठी दयावान बणून आले: डॉ.फजलुल्लाह चिस्ती.
चंद्रपूर (हरी वार्ता न्यूज नेटवर्क)
मानवतेच्या नावे एक संध्याकाळ या कार्यक्रमाच्या मध्यामाने काल प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित “हजरत पैगंबर साहेब सर्वांसाठी” या परिषदेत सर्व जाती धर्माच्या लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. एवढेच नव्हे प्रशासनाचे अधिकारी मंचावर एकत्र बसले होते, या कार्यक्रमात भारतीय एकात्मतेचे अभूतपूर्व दृश्य दिसून आले. शहिद टिपू सुलतान विचार मंचने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरात पहिल्यांदाच असा सलोखा दिसल्याने उत्साहाचे वातावरण होते.
कार्यक्रमाची सुरुवात तिलवात आणि “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा” या गीताने झाली त्याचे वाचन मौलाना नुरानी यांनी केले, यावेळी प्रामुख्याने मौलाना गुलाम नबी, स्वामी नारायण मंदिराचे संत श्री मनीषजी महाराज, गुरुद्वारा गुरुसिंह सभेचे ग्यानी मनजीत सिंह, महाबोधी बुद्ध विहारचे भन्ते अनिरुद्ध, सेंट अँड्र्यू चर्चचे रेव्ह. अँटोनिनो आमीर, एसडीपीओ चंद्रपूर सुधाकर यादव उपस्थित होते.
यावेळी हिंदू-मुस्लिम-शीख-बौद्ध-ख्रिश्चनयांनी एकत्र राहून देशाच्या प्रगतीसह पुढे जाण्याचे आवाहन केले. फझलुल्लाह चिस्ती इस्लामिक विद्वान यांनी प्रेषित मुहम्मद साहेब यांचे जीवन आणि मानवजातीच्या उद्धारावर सविस्तर विचार मांडले.
मुहम्मद साहेबांचा हवाला देत डॉ.चिस्ती म्हणाले की, मानवजातीला वाचवणाऱ्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने कल्याणकारी म्हणता येईल, महंमद साहेबांनी आपल्या एका भाषणात मानवजातीला सांगितले की, कोणताही गोरा माणूस कृष्णवर्णीयांपेक्षा चांगला वाईट नाही, गैर अरबी हा अरबी माणसापेक्षा चांगला वाईट नाही. तर जो मनापासून ईश्वर व अल्लाहची उपासना करतो तो देवाच्या जवळ असतो, स्त्रियांचा आदर करणे हे आपल्यासाठी एखादया आदेशासारखे आहे आणि सर्व धर्मांमध्ये स्त्रियांचे महत्त्व सांगितले गेले आहे. तसेच आजच्या तरुणांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने असे सर्वच तरुण राजकारणाचे चटकन बळी पडत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे, कोणत्याही धर्मावर भाष्य करण्यापूर्वी त्या धर्माची संपूर्ण माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे, आपल्या शहराची शांतता राखणे तुमची जबाबदारी आहे आणि ती पार पाडणाऱ्याचा सत्कारही प्रशासन करत आहे, अहिंसेची शिकवण देणाऱ्या या मानवजातीला मुहम्मद साहेबांनी सत्याचा आणि चांगुलपणाचा मार्ग दाखवला आहे, माणूस हा विद्वान जन्माला येत नाही. मात्र देवाने, अल्लाह ने, गॉड ने आपले दूत, पैगंबर किंवा संदेशवाहक पाठवून तुमची पोकळ बुद्धी विकसित केली आहे, त्यांच्या सुमारे दीड तासाच्या व्याख्यानात शेवटच्या सत्रात प्रश्नोत्तरेही घेण्यात आली आणि बौद्ध तथा हिंदूंनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही डॉ. चिस्ती यांनी दिलें.
श्री संत मनीष महाराज म्हणाले की, माणूस मेल्यानंतर स्वर्गाची आस बाळगतो पण या पृथ्वीला स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न करत नाही. पास्टर रवी अँटिनो आमीर यांनीही आपल्या भाषणात सांगितले की, आपण ज्यांना पैगंबर, मसिह किंवा प्रेषित म्हणतो अश्या महापुरुषांनी मानवजातीच्या कल्याणासाठी मोठें काम केलें. आपल्या भाषणात भंते अनिरुद्ध यांनी सर्व मानवजातीसाठी संविधान आणि मुहम्मद साहेबांच्या शिकवणीवर भर दिला.
यावेळी विशेष उपस्थित एसडीपीओ सुधाकर यादव म्हणाले की, ज्याप्रमाणे संविधानात आचारसंहिता आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक धर्मात आचारसंहिता आहे आणि ती आपण पाळली पाहिजे, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व धर्मीयांनी व सर्व जाणकार धर्मगुरूंनी देशाच्या एकतेवर विश्र्वास व्यक्त केला. असा हा देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शहीद टिपू सुलतान विचार मंचचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभियंता अमजद शेख यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आपला जिल्हा ही आपली जबाबदारी असून आपण सर्वांनी एकत्र राहून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे, शहीद टिपू सुलतान विचार मंच देशाच्या प्रगतीच्या प्रत्येक पायरीवर राष्ट्रासोबत आहे. आपला देश भारत पुढे नेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे
अध्यक्ष इंजी. जुबेर आझाद यांनी उपस्थितांचे आभार मानले, सल्लाउद्दीन काझी, सय्यद अबरार अली, अझहर खान, अस्लम चाऊस, सय्यद रमजान अली, हाजी फैसल पाशा, सोहेल मुस्तफई, अझहर शेख, सय्यद अफजल अली, अरबाब सय्यद, आबिद शेख, गुलजार खान, सय्यद शाहबाज, अकील शेख, मुख्तार शाह, जुबेर खान, इम्रान शेख, इर्शाद शेख, सादिक शेख, समीर अली, दानिश खान, नावेद शेख, इम्तियाज शेख यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले, सूत्रसंचालन प्रसिद्ध अँकर नसीर खान यांनी केले.