पप्पु देशमुख यांची वन विभागा विरोधात कठोर कारवाईची मागणी
चंद्रपूर (हरी वार्ता न्यूज)
वन हक्काचे दावे प्रलंबित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो आदिवासी व गैर-आदिवासी महिला-पुरुष शेतकऱ्यांनी वनविभागाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या लोकांनी वनहक्क कायद्यान्वये अतिक्रमण केलेल्या जमिनीचा पट्टा मिळावा यासाठी वनहक्क समितीमार्फत अर्ज केले, मात्र वनविभाग त्यांचे अतिक्रमण काढून जबरदस्तीने झाडे लावत आहे.
जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी व बिगर आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी निवासी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करून आपले म्हणणे मांडले व वनहक्कासाठी मान्यताप्राप्त सर्व पात्र लोकांना लवकरात लवकर मान्यता देण्याची मागणी केली. यातील प्रमूख मगण्यांमध्ये वनहक्क कायद्यान्वये अतिक्रमण केलेल्या जमिनीचा पट्टा मिळावा, वनविभागाकडून सक्तीची वृक्षलागवड थांबवावी, आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण करावे इत्यादींचा सामावेश आहे.