पालकमंत्र्यांचे पाठबळ आहे काय? ठेकेदार मानेना

118

सिमेंट रस्त्याचा बट्ट्याबोळ
चार महिन्यापूर्वी बांधलेला रस्ताही तडकला

गौतम सागोरे, बोर्डा.

बोर्डा सिमेंट रस्त्याचे काम सद्या सुरु असुन कामाच्या सुरुवातीलाच हा सिमेंट रस्ता दबू लागल्याने ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या कामाची तक्रार करूनही काहीच कारवाई न झाल्याने यात नेते आणि अधिकाऱ्यांचे संगनमत झाले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान बोर्डा शाळा समितीचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम सागोरे यांनी या कामावर आक्षेप घेत माहितीच्या अधिकारा अन्तर्गत अर्ज केला असुन जेवढे झाले तेवढे काम तोडून रस्ता नव्याने बनविण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे याच ठेकेदाराने चार महिन्यापूर्वी बांधलेल्या रस्त्याला भेगा पडल्याचे पाहायला मिळत आहे.
बोर्डा हा परिसर सद्या पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. या भागात वायगाव पर्यन्त रिसॉर्ट आणि फार्म हाऊस आहेत. अश्यात या ठिकाणी सिमेंट रस्ता आवश्यक आणि महत्त्वाचा मानून तशी मागणी करण्यात आली होती. ती मान्य होऊन या करिता लाखोंचा निधी मंजूर झाला आणि कामाला प्रत्यक्ष सुरूवातही झाली.
मात्र ठेकेदाराने अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी संगनमत करुन थातुर मातुर काम करायला सुरूवात केली. रस्त्यासाठी जे खोदकाम केलें ते मुळात योग्य नाही. नुसती लिपापोती केली आहे. ल्युज ची स्थिती सुद्धा गंभीर आहे. साधारण वाहन या रस्त्यावरून गेले तरी रस्ता दबु लागला आहे. अधिकाऱ्यांना कळवले तरी लक्ष देण्यास तयार नाहीत. ठेकेदाराला जाब विचारला जात नाही. यावरून ठेकेदार आणि अधिकारी यांचे संगणमत तर झाले तर नसावे अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. हा रस्ता तोडून बनविला तरच टिकेल अन्यथा काहीं दिवसातच याचे तिन तेरा झाल्याशिवाय राहणार नाहीत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गौतम सागोरे यांनी केला आहे. याची दखल घेतली नाही तर आंदोलनं करून ठेकेदाराला जाब विचारू असा इशारा सुद्धा सागोरे यांनी प्रस्तूत प्रतिनिधी जवळ बोलताना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here