विवीध नेत्यांच्या उपस्थितीत भीम शक्तीचा मेळावा
चंद्रपूर :
महिलांवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध खंभीरपणे लढण्या करिता भीम शक्ती संघटना सक्षम आहे. दलितच नव्हें ओबीसी, आदिवासी, भटके आणि सर्वच दबलेल्या समाजासोबत भिमशक्ती नेहमीच उभी राहील, असे ठाम मत भीम शक्ती संघटनेचे संस्थापक खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केले. ते चंद्रपूर जिल्हा भीम शक्ती संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्यामध्ये बोलत होते.
खासदार हंडोरे पुढे म्हणाले की, माझ्या मंत्रीकाळात चंद्रपूर येथे पहिले सामाजिक न्याय भवन उभे केले. महाराष्ट्रतील अत्यंत गरीब विध्यार्थी उच्य शीक्षित झाला पाहिजे यासाठी 100 निवासी शाळा व वसतिगृह निर्माण केली. बेरोजगार तरुण उद्योजक व्हावेत म्हणून प्रत्येकी 7 कोटीच्या 450 औद्योगिक सहकारी संस्था सामान्य कार्यकर्त्याना देऊन त्यांना मोठे उद्योजक बनविल्याचा दावा सुद्धा हंडोरे यांनी यावेळी केला.
विदर्भ दौऱ्यावर असलेले खासदार चंद्रकांत हंडोरे हे नागपूर दिक्षाभूमी येथील भीम शक्ती च्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याला हजेरी लावून याठिकाणी आले होते. दरम्यान चंद्रपूर जिल्हा भीम शक्तीने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. यात हँडोरे सोबतच भीम शक्तीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष एन. डी. पिंपळे, प्रा. अपेक्षा पिंपळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, एफडीए समितीचे राज्य संचालक सुनील दहेगावकर, राजू झोडे, दीक्षा पाटील यांचेसह भीम शक्तीचे अन्य पदाधिकारी उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्ती चे जिल्हाध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन कोमल बोरकर यांनी केले. भीमशक्तीच्या मेळाव्याला जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.