तेली समाजाचे सक्षम प्रतिनिधित्व करणार?
स्वच्छ प्रतिमा आणि अनुभव असल्याने पसंती
चंद्रपूर, दि.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अनुभवी उमेदवार राहिलेल्या डॉ. विश्वास झाडे यांनी दावेदारी केली असून तेली समाज आपल्याच पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा आणि अनुभव असल्याचा फायदा त्यांना मिळणार असा विश्वास विदर्भ तेली महासंघाच्या सभेत व्यक्त झाल्याने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी डॉ. झाडे यांनी जोरदार मोर्चबांधणी केली आहे.
तेली समाजाला राजकिय दृष्ट्या भाजप, सेना आणि राष्ट्रवादी सारख्या पक्षांनी सुद्धा केवळ वापरून घेतले, अशी भावना आता या समाजात बळावली आहे. हाच रोख समाज संघटनेच्या सभेत स्पष्ट झाला होता. डॉ. झाडे यांच्या पाठीशी समाजाने सक्षमपणे उभे रहावे, अश्या भावना सभेत उमटल्या. मागील निवडणुकीत डॉ. झाडे यांनी केलेली कामगिरी. त्यांना मिळालेला जनाधार आणि त्यानंतर सुद्धा डॉ. झाडे यांनी सूरू ठेवलेली सामाजिक कामाची परंपरा यामुळें अजूनही ते बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात आपलीं भक्कम छाप ठेवून आहेत. याशिवाय त्यांची प्रतिमा आणि कामाची चांगली ओळख कायम आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराशी भिडण्याचे सामर्थ्य सुद्धा असल्याने तेच काँग्रेस ची योग्य निवड ठरू शकतात, असे दावे केले जात आहेत. आता विजयाचा आत्म विश्वास असलेल्या डॉ. झाडे यांना काँगेस उमेदवारी करिता निवडून घेते काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.