धानोरकर, धोटे पाठोपाठ वासनिकांशी ही डॉ. झाडे यांची भेट

50

सकारात्मक चर्चेने राजकिय चर्चांना उधाण
चंद्रपूर, दि.
चंद्रपूर जिल्हयात राजकिय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस पक्षात अधीक उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच मंगळवारी खासदार धानोरकर आणि आमदार धोटे यांच्या भेटी पाठोपाठ ज्येष्ठ राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक याच्याशी भेट झाल्याने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. ओबीसी ना प्राधान्य देण्याची मागें झालेल्या मागणीच्या अनुषंगाने तेली समाजाचे डॉ. विश्र्वास झाडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
बल्लारपूर विधानसभे करिता इच्छुक असलेले डॉ. विश्र्वास झाडें यांच्या घरी मंगळवारी काँग्रेस च्या बड्या नेत्यांनी सदिच्छा भेट दिली होती.
चंद्रपूर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार प्रतिभा धानोरकर ,राजूराचे आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी डॉ. विश्वास झाडे यांच्या घरी भेट देऊन विवीध राजकिय तसेच सामाजिक विषयांवर चर्चा केली होती.
डॉ. विश्र्वास झाडे हे बल्लारपूर विधानसभेचे माजी उमेदवार आणि आता इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनीं 8 ऑक्टोबर ला झालेल्या पक्षाच्या मुलाखतीत आपली बाजू भक्कम पणे मांडली आहे. त्यांना सर्वच स्तरातून पसंती मिळत आहे. या विधानसभा क्षेत्रात तेली समाजाचे बाहुल्य असल्याने त्यांच्या नावाची सद्या जोरदार चर्चा सूरू आहे. विरोधकांनी काही माध्यमांना सांगून त्यांच्या उमेदवारी बद्दल चुकीच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. यावरून त्यांच्या चुरशीच्या उमेदवारीची चर्चा आणखी जोमाने होऊ लागली आहे. दरम्यान खासदार धानोरकर आणि आमदार धोटे यांची भेट ही पारिवारिक तसेच औपचारिक होती. यात सकारात्मक चर्चा झाल्या, अशी माहिती डॉ. झाडे यांनी दिली होती. मात्र लगेच दोन दिवसात डॉ. झाडे यांनी काँग्रेस चे राष्ट्रीय नेते आणि ज्येष्ठ पदाधिकारी मुकुल वासनिक यांची भेट घेऊन अनेकांना धक्का दिला आहे. काँग्रेस युती मधुन अनेक नावांची चर्चा आहे. विरोधक सुद्धा यातल्या काही नावांची शिफारस स्वतः करत असल्याची चर्चा आहे. अशात डॉ. झाडे सारखा न विकणारा सक्षम उमेदवार काँग्रेस ला तारू शकतो आणि विरोधकाला घाम फोडू शकतो असा काही राजकिय जाणकारांचा विचार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here