राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या सेवाभावी प्रकल्पाचा श्रीगणेश
चंद्रपूर/हरी वार्ता नेटवर्क
रविवार ६ ऑक्टोबर रोजी बिनबा मार्गावरील डॉ. अभिषेक दीक्षित यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डॉ. हेडगेवार रक्त संकलन केंद्राचा श्रीगणेश कऱण्यात आला. माजी केंद्रीय राज्य मंत्री आणि एनसीबीसी चे राष्ट्रिय अध्यक्ष हंसराज अहिर यांचें हस्ते या केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी मंचावर डॉ. किर्तीवर्धन दिक्षित- माजी कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, श्री तुषार देवपुजारी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक, डॉ. अभिषेक दिक्षित व डॉ. संपदा दिक्षित- संचालिका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर , श्री आशिष धर्मपुरीवार – सचिव, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती(पूर्व विदर्भ) , अशोक पत्की – सचिव, डॉ. हेडगेवार रक्त केंद्र, नागपूर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी श्री अहिर यांनी चंद्रपुर शहरात असलेली रक्क्ताची मागणी व अस्तित्वात असलेल्या रक्तपेढी या अपुऱ्या पडत होत्या. या नव्यानी सुरु झालेल्या रक्त साठवणूक केंद्रामुळे नक्कीच चंद्रपुरात असलेल्या रक्ताच्या मागणीची काही प्रमाणात पूर्तता होण्यास मदत होईल. या प्रसंगी त्यांनी डॉ. हेडगेवार रक्त साठवणूक केंद्र, नागपूर सन १९८९ पासून अवितर उत्तम कार्य या क्षेत्रात करीत आहे व चंद्रपूरात सुद्धा असेच उत्तम कार्य संस्था करेल असा माझा पूर्ण विश्वास व्यक्त केला. स्व. शांतारामजी पोटदुखे यांनी सुरु केलेल्या वाढदिवसानिमित्य रक्तदान या अभियानाची आठवण केली. रक्तपेढी सुरु परत होतील परंतु जनतेनी जागृत होऊन स्वतः पुढे येऊन रक्त दान करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक श्री तुषार देवपुजारी यांनी त्यांच्या भाषणात संघाचे सेवा कार्य पूर्ण विश्वभरात अविरक्त सन 1925 पासून सुरु आहे त्याचाच एक भाग म्हणजे डॉ. हेडगेवार रक्त केंद्र हा प्रकल्प असल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पत्की – सचिव, डॉ. हेडगेवार रक्त केंद्र, नागपूर यांनी तर आभार श्री आशिष धर्मपुरीवार – सचिव, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती(पूर्व विदर्भ) यांनी मानले. या प्रसंगी चंद्रपुरातील मोठा डॉ.वर्ग, महाविद्यालयीन प्राचार्य, व्यापारी वर्ग व चंद्रपुरातील सन्माननीय नागरिक माता सज्जन उपस्थित होते.