काँग्रेस नेत्यांचा नाना पटोले यांना आग्रह
संजय शिंदे/ दुर्गापूर
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ओबीसी उमेदवारच द्यावा अशी आग्रहाची मागणी करत या क्षेत्रातील नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. या मतदार संघात कुणबी, माळी आणि तेली समाजाची मत संख्या निर्णायक आहे. त्यामूळे निवडणुकीचे समीकरण बनविताना ओबीसी फॅक्टर ध्यानात घेतला जावा. असे न झाल्यास पक्षाला नुकसान होऊ शकते, अश्या आशयाची चर्चा यावेळी कऱण्यात आली. मात्र ही चर्चा कुणाला केन्द्र स्थानी घेऊन कऱण्यात आली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या चर्चेत सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये माजी जिल्हा परीषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी ईतर ओबीसी नेत्यांचे नेतृत्व करत ही चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे.
या क्षेत्रासाठी स्वतः मारकवार इच्छुक असल्याचे कळते. याशिवाय अभिलाषा गावतुरे, डॉ. विश्वास झाडे यांचीही नावे आघाडीवर आहेत.