6 विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती
प्रोफाईल आणि पक्षनिष्ठा तपासणार
चंद्रपूर:(हरी वार्ता न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर जिल्ह्याच्या सहाही विधानसभा करिता काँग्रेस कडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीचा मुहूर्त निघाला असुन एक आमदारच भावी आमदारांच्या भवितव्यावर शिक्कमोर्तब करणार आहेत. विप सदस्य अभिजित वंजारी हे 8 ऑक्टोबर रोजी या मुलाखती घेणार आहेत. बंगाली कॅम्प बायपास मार्गावरील इंटक भवनात हा कार्यक्रम चालणार असुन चंद्रपूर जिल्हयातील सहाही विधानसभा करिता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या प्रोफाईल आणि पक्षनिष्ठा तपासून निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हयात ईतर कुठल्याही क्षेत्रापेक्षा आरक्षित चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने वंजारी यांची दमछाक होणार आहे.