काँग्रेस चे विप सदस्य अभिजित वंजारी यांचें पर्यवेक्षण
हवसे-नवसे लागणार कामाला
चंद्रपूर.
चंद्रपूर चे राजकीय वातावरण तापू लागले असून काँग्रेस च्या इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत. आज पासून 8 दिवस हा कार्यक्रम चालेल असे सूत्रांनी सांगितले आहे. याकरिता काँग्रेस चे विधान परीषद सदस्य अभिजित वंजारी चंद्रपूर दौऱ्यावर असतील.
इच्छुकांनी अर्ज केल्या नंतर आता त्यांच्या मुलाखती घेतल्या जातील. यातुन मिळालेली माहिती प्रदेश अध्यक्ष आणि ईतर निर्णायक वरिष्ठांकडे पाठविली जाईल. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाणार आहे.
काँग्रेस मध्ये सद्यातरी उमेदवारी वरून घमासान माजले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश बघता चंद्रपूर विधान सभेत काँग्रेसच विजयी होईल असा कयास कित्येकांनी लावला आहे. याच कायासातून अनेकांना आमदारकिचे स्वप्न दिवसाही पडू लागले आहेत. त्यामुळेच एका आरक्षित जागेसाठी तब्बल 22 जणांनी अर्ज केले आहेत. यात काही नवख्या नावांचा सुद्धा सामावेश आहे.