जन विकास चे पप्पु देशमुख यांची माहिती
चंद्रपूर:बल्लारपूर-चं द्रपूर ते मुंबई व पुणे पर्यंत नियमित रेल्वे गाडीचा या भागातील नागरिकांचा अधिकार आजपर्यंत नाकारणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा जनविकास सेना व बल्लारपूर शहरातील विविध संघटनेतर्फे काल 30 सप्टेंबर रोजी धिक्कार करण्यात आला.
बल्लारपूर-चंद्रपूर ते मुंबई व पुणे पर्यंत नियमित रेल्वे गाडी ही मागणी नसून या भागातील जनतेचा अधिकार असल्याचा नारा जनविकास सेनेने दिला आहे. हा अधिकार मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे विरोधात जनविकास सेनेतर्फे नियोजनबद्ध व निर्णायक जनआंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची उद्या 2 आक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्त रितसर घोषणा करण्यात येणार आहे. जटपुरा गेट येथे सकाळी 11 वाजताच्या दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून या आंदोलनाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली