4 महिने टप्प्या टप्प्याने चालणार जन आंदोलन
चंद्रपूर:
मुम्बई पुणे नियमीत ट्रेन आणि इतरही महत्वाच्या रेल्वे गाड्यांसाठी जन विकास ने योजनाबद्ध आंदोलनाची घोषणा आज गांधी जयंती निमित्त केली. आता आर-पार ची संवैधानिक लढाई लढू असा निर्वाणीचा इशारा देत माजी नगरसेवक आणि जन विकास चे प्रमुख पप्पु देशमुख यांनी तीन महिन्यांचा सुनियोजित लढा जाहिर केला. गांधी चौकात केलेल्या रेल अधिकार जन आंदोलन दरम्यान ही घोषणा करण्यात आली.
गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेचे पुजारी असलो तरी न्याय आणि अधिकारासाठी प्रसंगी शहीद भगतसिंग यांचा मार्गही अवलंबू असा सज्जड इशारा यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी दिला. हे आंदोलनं सुरुवातीला तीन टप्प्यांत होईल आणि चौथ्या टप्प्यात रेल्वेची माल वाहतूकिच्या मुसक्या आवळल्या जातील.
पहिल्या टप्प्याची सुरूवात आज पासून झाली. हा टप्पा 25 नोव्हेंबर पर्यंत चालेल. यात जन जागृती, जन समर्थन आणि पत्रव्यवहार केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात 26 नोव्हेंबर ते 31डिसेंबर पर्यन्त सत्याग्रह, धरणे आणि उपोषण केले जाईल. 1 ते 31 जानेवारी पर्यंतच्या तिसऱ्या टप्प्यात मोर्चे, आमदार खासदार आणि मंत्र्यांना घेराव घालण्यात येईल.
यावेळी राजू काबरा, इमदाद शेख, अक्षय येरगुडे, गोलू दखणे, सतीश घोडमारे, अनिल दहागावकर, धनंजय तावाडे, आशिष रामटेके, प्रफुल बैरम, अमोल घोडमारे, इमरान रजा, संदीप कष्टी, सतीश आकनुलवार, हरिभाऊ बिस्वास, खुशाबराव कायरकर, प्रफुल बजाइत, दामोदर मेश्राम, सोनल धोपटे, नंदू लभाने, राजेश पेशेट्टीवार, निखिल पोटदुखे, धवल माकोडे, किशोर महाजन, आकाश माणूसमारे, मनीषा बोबडे, कविता अवथनकर, अरुणा महातळे, ललिता उपरे, नेहा लाबाडे हे उपस्थित होते.