आमदारांनी ही स्पष्ट केले, मी शिक्षकांचा प्रतिनिधी
बोर्डा:
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत बोर्डा सारख्या आड वळणावरील शाळेने 11 लाखांचा जिल्ह्याचा पहिला पुरस्कार नुकताच पटकावला. यानिमित्त शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांनी मंगळवार (दि. 1ऑक्टोबर) ला या शाळेला सदिच्छा भेट दिली.
यावेळी विमाशी संघाचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक प्रशांत काटकर, शाळा समिती अध्यक्ष प्रमोद डोर्लिकर, शाळेचे शिक्षक पोटे, गंधारे, शिक्षण प्रेमी गौतम सागोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार अडबाले यांनी विवीध वर्ग खोल्या आणि संगणक कक्ष आदींना भेटी देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्याध्यापक काटकर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्याकडून शाळेच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी आमदार अडबाले यांनी स्पष्ट केले की, ते राजकारणी नाहीत तर शिक्षकांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे या शाळेच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडविणे हेच त्यांचें प्रथम लक्ष्य आहे. यावेळी त्यांना शाळेच्या प्रगतीचा आलेख सादर करण्यात आला. दरम्यान विज्ञान आणि गणिताच्या शिक्षक तसेच ईतर रिक्त पदांमुळे काय अडचणी येत आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले. बनकर नावाचे शिक्षक गेल्या दीड वर्षांपासून गैरहजर असल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणही यावेळी करण्यात आली.शाळेचा दर्जा कायम राखायचा असेल तर रीक्त पदे आणि स्थायी शिक्षक फारच गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. त्यावर उत्तर देताना आमदार अडबाले यांनी लवकरच या समस्या सोडवू असे आश्वासन दिले. उल्लेखनीय आहे की, या आदर्श आणि सुंदर शाळेत 8 वर्ग आहेत. मात्र शिक्षकांची संख्या 5 आहे. त्यामुळे या वर्षी या शाळेतून नवोदय तसेच शिष्यवृत्ती साठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.