जन विकास सेनेचा लोकोपयोगी उपक्रम
बांधकाम मजुरांसाठी चर्मरोग निदान शिबिर
बंगाली कँप येथे 300 हून अधिक मजुरांना लाभ
चंद्रपूर, जन विकास सेना, बंगाली कॅम्प विभाग आणि श्री महाकाल सेवा समितीच्या वतीने बांधकाम मजुरांसाठी मोफत चर्मरोग निदान शिबिर बुधवारी आयोजीत करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जन विकास सेनेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केले. यावेळी प्रख्यात चार्मरोग तज्ञ डॉ. प्रकाश रामटेके, आयोजक जन विकास चे बंगाली कॅम्प विभाग अध्यक्ष हरी बाबा बिस्वास, प्रसिद्ध छायाचित्रकार गोलू बाराहाते, पत्रकार गौतम सागोरे आणि ग्राहक मंचाचे संजय शिंदे उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटकिय संबोधन करताना पप्पू देशमुख यांनी भविष्यात आरोग्य समस्यांसाठी जन विकास च्या माध्यमातून मोठें कार्य करणार असल्याचे सांगितले. बंगाली कॅम्प विभागातील 11 वार्डांच्या विवीध विकास तसेच ईतर समस्यांसाठी सुद्धा भरीव कार्य केले जाणार असल्याची माहिती दिली. या शिबिरात 300 पेक्षा अधिक बांधकाम मजुरांची तपासणी करुन त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी राहुल स्वामी, अभय रॉय, संदीप, प्रबिर देबनाथ, नवाब, केतू, पेंदरे यांनी परिश्रम घेतले.