व्यापार, शिक्षण, उपचार आणि नोकरी करणे जीवावर
चंद्रपूर राज्याला मोठा महसूल देणारा महत्त्वाचा चंद्रपूर-बल्लारपूर झोनच राजधानी मुंबई आणि शैक्षणिक. राजधानी पुणे पासुन रेल्वेने दूर ठेवला आहे. हा लाखों लोकांच्या संवैधानिक अधिकारावर अन्याय आहे. त्यामूळे मुम्बई-पुणे साठी नियमित रेल्वे गाडी ही मागणी नव्हें अधिकार आहे, असे म्हणत आज (सोमवार दि. ३०) पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात जन विकास सेनेने बल्लारपूर रेल्वे स्टेशन पुढे तीव्र निदर्शने केली. मुसळधार पावसात सुद्धा रेल्वे प्रशासना विरोधात संताप व्यक्त करत प्रचंड नारेबाजी करुन धिक्कार करण्यात आला. या धिक्कार आंदोलनाने समस्त बल्लारपूरकरांचे लक्ष वेधले होते.
बल्लारपूर व्यापारी संघासोबतच विवीध संस्था संघटनांनी या धिक्कार आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे रेल्वे स्टेशन वर जेव्हा आंदोलनकर्त्यांचा जत्था पोहोचला तेव्हा पोलिस प्रशासनाने स्टेशन पुढे आंदोलन करण्यास मनाई केली. परिणामी संतप्त लोकांनी रेल्वे स्टेशन चौकात ही निदर्शने केली. यावेळी मुसळधार पाऊस सुरु होता.
*राजकारण नको, सत्कारण हवे*
देशाच्या 16 राज्यातील जनता चंद्रपूर जिल्हयात वास्तव्यास आहे. त्यांना त्यांच्या राज्यात जायला भरपूर गाड्या आहेत पण त्यांचा व्यापार, उद्योग, नोकरी, वैद्यकीय उपचार किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मुम्बई-पुणे येथे जायला नियमित गाडीच नाही. ही मोठी समस्या केवळ चंद्रपूर-बल्लारपूर मध्येच आहे. ही खरं तर शरमेची बाब आहे. पालकमंत्री बिना मागणी आणि बिना गरजेची वंदे भारत ट्रेन सुरु करतात अशावेळी त्यांनी जर मुंबई-पुणे साठी नियमित ट्रेन आणली तर त्यांचा सत्कार करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
*मेहनत करे मुर्गा..*
मध्य रेल्वे च्या नागपूर विभागाने चंद्रपूर- बल्लारपूर च्या भरवश्यावर 5000 कोटींपेक्षा जास्त महासुल कमावला. कोळसा आणि ईतर खनिजांच्या वाहतुकीतून हा महसूल वाढतोच आहे. असे असताना जर राज्याच्या राजधानीशी स्थानीक नागरीक वंचित राहत असतील तर हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. मुंबई-पुणे नियमित रेल्वे गाडी तत्काळ सुरु न झाल्यास रेल्वेची माल वाहतूकच बंद करू असा सज्जड इशारा माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी दिला.
*ही तर सुरूवात आहे*
हे आंदोलनं केवळ सुरूवात आहे. रेल्वे प्रशासनाचे डोके यातून ठिकाणावर आले तर ठीक नाही तर एकही नफेखोर माल गाडी इथून पुढे सरकू देणार नाही. मुंबई-पुणे नियमित गाडी व्यतिरिक्त इतरही जनहिताच्या व आवश्यक गाड्या लवकर सुरु करत नाही तोपर्यंत आंदोलनं वेगवेगळया मार्गाने सुरूच राहील.
-पप्पू देशमुख