गार्डन सोसायटी आणि आयएमए चा संयुक्त उपक्रम
दिली निसर्ग प्रेम आणि संवर्धनाची प्रेरणा
चंद्रपूर, (हरी वार्ता नेटवर्क)
“रविवार, 12 जानेवारीला फुलांच्या भव्य प्रदर्शनाचा यशस्वी उपक्रम “फ्लॉवर शो” चंद्रपूर गार्डन सोसायटी व इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 12 जानेवारी रोजी IMA हॉल मध्ये भव्य फुलांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामुळे झाडांचे संवर्धन आणि निसर्गाविषयी प्रेम बालकांमध्ये रुजविण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली.
या फुलांच्या प्रदर्शनामध्ये फुलांच्या मांडणीच्या स्पर्धा, बोन्साय झाडे, पॉटस्केप मिनिएचर गार्डन, आरोग्यदायी गुलाब, ताज्या फुलांच्या दागिन्यांच्या स्पर्धांना निसर्गप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. याशिवाय, फुलांच्या मांडणीवर आयोजित केलेली मोफत प्रात्यक्षिक क्लास प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरली.
गार्डन सोसायटीचे कार्यकारी मंडळ: अध्यक्ष: श्रीमती शाहीन अहमद उपाध्यक्ष: श्रीमती आदिती तातावार खजिनदार: ॲडव्होकेट श्रीमती विजया बांगडे
सल्लागार: डॉ. पल्लवी अलुरवार सचिव:श्रीमती संजाली चौहान व श्रीमती वर्षा दत्तात्रय IMA चंद्रपूर कार्यकारी मंडळ:अध्यक्ष: डॉ. संजय घाटे सचिव: डॉ. प्रवीण पंत खजिनदार: डॉ. अप्रतीम दीक्षित या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये गार्डन सोसायटी व IMA चंद्रपूर कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी अतिशय परिश्रम घेतले.
प्रदर्शनामध्ये फुलांच्या कुंड्यांचा, खतांचा व झाडांचा विक्रीसाठी विशेष स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्यांनी लोकांचे विशेष लक्ष वेधले.हा शो निसर्गप्रेमींमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणारा ठरला आणि पुढील उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिले.