मुनगंटीवार,अहिर सहित अनेक दिग्गज उपस्थित
काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष ठेमसकरही भाजपात
चंद्रपूर दि.27
चंद्रपूर मध्ये झालेल्या राजकीय घडामोडीत अखेर आज अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरवापसीचा मुहूर्त ठरला आणि जोरदार भाजपावासी झाले. त्यांच्या समवेत काँग्रेस च्या माजी जिल्हा महिला प्रमुख नम्रता ठेमस्कर यांनी सुद्धा भाजप मध्ये प्रवेश केला.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, राहुल पावडे, कडू, हरिश शर्मा इत्यादी भाजप नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.
जोरगेवार यांचे स्वागत करून विधीवत प्रवेश झाल्यानंतर भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि पालक मंत्री गुनगंटीवार यांनी पत्र परिषदेस संबंधित केले. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक साधक बाधक प्रश्नांना उत्तरे दिली. दरम्यान नाना श्यामकुळे यांच्या संदर्भातील प्रश्नावर बाहेरचे नेते म्हणजे कोण? याचा खुलासाही त्यांनी केला. एवढेच नव्हे तर चंद्रपूर विधानसभा भाजपा जिंकून घेंईल. यासाठी सर्व कार्यकर्ते पणाला लागतील, असा दावाही त्यांनी केला.