भाजपच्या पहिल्याच यादीत मुनगंटीवार
- चंद्रपूर दि. 20
आगामी विधानसभा निवडणुकी करीता आज भाजपने 99 लोकांची पहिली उमेदवार यादी घोषित केली यात सुधिर मुनगंटीवार यांचें नाव असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उमेदवारी निश्चित झाली आहे.
भाजप च्या यादीकडे पाहिले तर बावनकुळे यांचें पुनर्वसन स्पष्ट आहे. या यादीत स्टार उमेदवार आहेत. मुनगंटीवार लोकसभेच्या परभवा नंतर बल्लारपूर साठी सक्रिय होतें. तिकडे मुनगंटीवार यांचें राजकिय शिष्य ब्रिजभूषण पाझारे मात्र अजूनही अधांतरी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ते चंद्रपूर साठी कंबर कसून बसले आहेत. दोनदा त्यांचा हिरमोड होत असल्याचे जाणकार सांगतात.