अन्नपूर्णा असलेल्या अम्मा वर सोमवारी होणार अंत्यसंस्कार
चंद्रपूर, (हरी वार्ता नेटवर्क)
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि यंग चांदा ब्रिगेड चे संस्थापक किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई जोरगेवार उपाख्य “अम्मा” यांचे आज निधन झाले. उद्या दिनांक 21 ऑक्टोबर रोजी त्यांचे निवास स्थान राजमाता निवास, कोतवाली वॉर्ड, चंद्रपूर येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. आमदार जोरगेवार यांनी कोरोना काळात अम्मा चे टिफीन गोरगरीब जनतेसाठी सुरू केले होते. अम्माचे टिफीनची चर्चा देशभरात झाली. अम्मा टिफीन साठी त्यांना अनेक पुरस्कारच मिळाले नाहीत तर अनेक नेत्यांनी प्रत्यक्षात अम्माची भेट घेऊन प्रशंसा केली. अम्मा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगुबाई जोरगेवार ह्या पिढीजात बांबू हस्तकला व्यवसाय चालवीत होत्या. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी जुन्या पालीकेच्या सात मजली इमारतीच्या खाली बांबू टोपल्या विकण्याचा व्यवसाय सुरू होता. गंगुबाई जोरगेवार यांच्या निधनामुळे जोरगेवार परीवारावर खुप आघात झाला आहे. त्यांच्या निधनाने बुरुड समाजच नव्हे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.