चंद्रपुर पोलिसांची भारतरत्न रतन टाटा यांना आदरांजली

71

 शाळा दत्तक योजना उद्घाटन कार्यक्रम केला रद्द

चंद्रपुर, (हरि वार्ता न्यूज)

चंद्रपूर पोलीस प्रशासनाने गुरुवारी नियोजित शाळा दत्तक योजना उद्घाटन कार्यक्रम रद्द करून भारतरत्न रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे. गुरुवारी सकाळी साडे 10 वाजता हा कार्यक्रम स्थानिक प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात नियोजित होता.

राज्य पोलीस प्रशासन अंतर्गत चंद्रपूर पोलिसांच्या वतीने “आपल्या सोबत, आपल्या साठी” हे ब्रीद घेऊन शाळा दत्तक योजना सूरू केली आहे. त्याचा उद्घाटन समारंभ गुरूवार 10 ऑक्टोबर रोजी नियोजित होता. यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तर प्रमूख पाहुण्यांमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सोबतच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, गडचिरोली चे खासदार डॉ. नामदेव किरसान, शिक्षक आमदार सुधाकर अडवाले, चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार, विप सदस्य अभिजीत वंजारी, चिमूर चे आमदार किर्तीकुमार भांगडिया, राजुराचे आमदार सुभाष धोटे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजवळ, जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर चे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिप चे सीईओ विवेक जॉनसन, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावंकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अपर पोलिस अधीक्षक रिना यादवराव जनबंधु यांची उपस्थीती राहणार होते. मात्र भारतरत्न रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here