बल्लारपूर नंतार चंद्रपूरचाही नंबर
भ्रष्टाचाराची चौकशी करून कठोर कारवाई करा: देशमुख
चंद्रपूर/ (हरी वार्ता नेटवर्क)
चंद्रपुरात आज 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील बसस्थानकाची दुर्दशा उघडकीस आणली. बसस्थानकाच्या छतावरून पावसाचे पाणी टपकू लागले, त्यामुळे शेकडो प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागले. विमानतळासारखी सुविधा देण्याचा दावा करत हे बसस्थानक अवघ्या काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आले.
बसस्थानकाची दुर्दशा
बसस्थानकाच्या छतावरून पावसाचे पाणी टपकल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. बसस्थानकात उभ्या असलेल्या लोकांना भिजण्यापासून वाचवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. बसस्थानकाच्या कामावर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे.या प्रकरणातून बसस्थानकाची दुर्दशा तर दिसून आलीच, शिवाय मॉडेल अंतर्गत उभारण्यात आलेल्या सरकारी प्रकल्पांतील भ्रष्टाचाराचारही उघडकीस आला.
जनविकास सेनेची मागणी
बस स्टैंड ला चाररी बाजूनी गळती लागल्यानंतर काही प्रवाशांनी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांना फोन करून पाचारण केले. देशमुख यांनी जनविकास सेनेचे इमदाद शेख व अमोल घोडमारे यांच्यासह बसस्थानकाला भेट देऊन प्रवाशांसी संवाद साधला. बसस्थानकाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.