मुम्बई: (हरी वार्ता नेटवर्क)
गडचांदुर निवासी विजयक्रान्ति कॉन्ट्रैक्ट लेबर यूनियन चै जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे यांची राष्ट्रीय मजदूर कांग्रेस ( इंटक ) शाखा महाराष्ट्र च्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
१० ऑक्टोबर रोजी कामा हॉल, मुंबई येथे महाराष्ट्र इंटक चे अध्यक्ष कैलाश कदम यांनी ही निवड केली. दरम्यान नियुक्ती पत्रसोबतच पुष्प देऊन ठाकरे यांचें स्वागत करण्यात आले.
या सोबतच राज्य कार्यकारीनी करीता चंद्रपुर जिल्ह्यामधून वरिष्ठ नेते केके सिंह चंद्रपुर, शंकर दास सास्ती संघटन सचिव तसेच धनंजय गुंडावार कार्यकारिणी सदस्य वेकोलि यांची सुद्धा नियुक्ति कऱण्यात आली आहे. मुम्बई येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सर्व नव नियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.