पोलीस विभागाची मोठी योजना
चंद्रपूर/(हरी वार्ता न्यूज)
पोलीस महाराष्ट्र अन्तर्गत चंद्रपूर पोलिसांच्या वतीने “आपल्या सोबत, आपल्या साठी” हे ब्रीद घेऊन शाळा दत्तक योजना सूरू केली आहे. त्याचा उद्घाटन समारंभ गुरूवार 10 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता होत आहे. हा “शाळा दत्तक योजना” उद्घाटन सोहळा प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात होईल.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तर प्रमूख पाहुण्यांमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सोबतच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, गडचिरोली चे खासदार डॉ. नामदेव किरसान, शिक्षक आमदार सुधाकर अडवाले, चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार, विप सदस्य अभिजीत वंजारी, चिमूर चे आमदार किर्तीकुमार भांगडिया, राजुराचे आमदार सुभाष धोटे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजवळ, जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर चे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिप चे सीईओ विवेक जॉनसन, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावंकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल,
अपर पोलिस अधीक्षक रिना यादवराव जनबंधु यांची उपस्थीती राहणार आहे. नागरिकांसोबत आता शालेय मुलांच्या सुरक्षेचं कर्तव्य सुद्धा पोलिस बजावतील.